नाशिकमध्ये कर्जदारांवर त्वरित कारवाई करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे आदेश

January 20, 2011 11:43 AM0 commentsViews: 4

20 जानेवारी

नाशिकमधल्या सहकारी नागरी बँका थकबाकीदार कर्जदार असलेल्या बिल्डर लॉबीनं वैतागल्या आहेत. सहकारी बँकांची कोट्यावधीची कर्ज बुडवून हे बिल्डर्स सराईत गुन्हेगारी करत असल्याचे प्रकार पुढे आले आहेत. या मोठ्या थकबाकीदारांवर वसुलीची कारवाई करताना पोलिस संरक्षण देत नसल्याच्या बँकांच्या तक्रारी आहेत. त्याबद्दल गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेतली आणि या सराईत कर्जदारांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले.

close