महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना मारहाण ; गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची दिरंगाई

January 20, 2011 12:08 PM0 commentsViews: 5

20 जानेवारी

महाबळेश्वर आणि पाचगणीत येणार्‍या पर्यटकांसाठी पॅराग्लायडिंग हे आर्कषण असतं. अशीच पर्यटनाची मजा लुटणार्‍या रशियन पर्यटकांना आरपीआयचे स्थानिक अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी मारहाण केली. रशियन पर्यटक डेनिस बर्ड निकोव्ह आणि त्याचे साथीदार यांनी पोलिस स्टेशनमध्ये यासंबधी तक्रार दाखल केली. या मारहाणीचे व्हिडिओ फुटेजही पोलिसांना त्यांनी सादर केलं. त्यात गायकवाड यांनी पर्यटकांना मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत. पण तरीही पोलिस संबंधितांवर गुन्हा दाखल करत नाही.

close