लोकलच्या ‘लेडिज स्पेशल’ डब्ब्यातून दारु नेणार्‍या महिलांना अटक

January 20, 2011 12:19 PM0 commentsViews: 4

20 जानेवारी

सेंट्रल रेल्वेवर सुरु असलेल्या लेडिज स्पेशल ट्रेनमधुन भट्टीच्या दारुची वाहतुक करताना तीन महिलांना अटक करण्यात आली. कल्याण-सीएसटी ट्रेनमध्ये या महिलांना अटक करण्यात आली आहेत. दोन ते अडीच लिटरच्या प्लास्टिकच्या पिशव्यांमधून त्या दारु वाहतूक करत होत्या. या तिघींना याआधीही एकदा याच कामासाठी अटक करण्यात आली होती. धारावी आणि आजुबाजुच्या भागात विकण्यासाठी या दारुची वाहतुक त्या करत असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यांच्यावर दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close