मुंबई महानगरपालिकेची गाडी चोरीला गेली

January 20, 2011 12:10 PM0 commentsViews: 39

20 जानेवारी

मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते राजहंस सिंग यांची महापालिकेची गाडी चोरीला गेल्याचा प्रकार घडला. एम.एच. 01 वाय.ऐ.3059 नंबरची स्कॉर्पिओ गाडी मंगळवारी दुपारी चोरीला गेल्याचं समजत आहे. तर या संबंधी आज वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. वरळीतल्या सासमिरा मार्ग परिसरातून ही गाडी चोरीला गेली. ड्रायव्हर गाडी पार्क करून बाहेर गेला असताना गाडी चोरीला गेली.

close