गोंदियातल्या संशयिताला मारहाण प्रकरणी 7 वन अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल

January 20, 2011 12:36 PM0 commentsViews: 1

20 जानेवारी

गोंदियातल्या संशयिताला मारहाण प्रकरणी तिथल्या 7 वन अधिकार्‍यांवर गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. शिवाय या सगळ्या प्रकरणी वनखात्याने अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. या अधिकार्‍यांना आता कुठल्याही क्षणी अटक होवू शकते. जिल्ह्यातल्या गोरेगाव वनक्षेत्रात 20 दिवसांपूर्वी एका रानगव्याची शिकार झाली होती. या प्रकरणी गोरेगाव वन खात्याच्या कर्मचार्‍यांनी जवळच्या गावातल्या पोतनलाल पटले याला चौकशीसाठी ताब्यात घेवून त्यांना विवस्त्र करुन त्यांचा विकृत छळ केल्याचं उघड झाल होतं. दोषी कर्मचार्‍यांना सेवेतून बडतर्फ करावं अशी मागणीही भाजपने केली आहे.

close