स्वाभिमान संघटनेच्या कामाचा फायदा काँग्रेसलाच होतो – राणे

January 20, 2011 5:51 PM0 commentsViews: 16

20 जानेवारी

काँग्रेसमध्ये समांतर संघटना नको या शब्दात युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव आणि माणिकराव ठाकरेंनी निलेश राणे यांना स्वाभिमान संघटनेबाबत फटकारलं होतं. पण आता पक्षाच्या या धोरणाला नारायण राणे यांनी उत्तर दिलं. स्वाभिमान संघटना एक एनजीओ (सामाजिक संस्था) असून या संघटनेच्या कामाचा फायदा काँग्रेसलाच होतो असा दावाही नारायण राणे यांनी केला. ते चिपळूणमध्ये बोलत होते.

close