मांढरदेव यात्रेला भाविकांची गर्दी

January 20, 2011 12:57 PM0 commentsViews: 80

काळुबाईच्या नावाने चांगभलं..

20 जानेवारी

सातारा जिल्ह्यातल्या मांढरदेव यात्रेला भाविकांची भरपूर गर्दी होते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातल्या लाखो भाविकांचं मांढरदेवची काळूबाई हे श्रद्धास्थान आहे. मांढरदेव येथे शाकंभरी पोर्णिमेच्या मुहुर्तावर पाच लाखापेक्षा जास्त भाविक यात्रेसाठी जमा झाले होते. पहाटेपासूनच लोकांनी गर्दी केली होती. काळुबाईच्या नावाने चांगभलं असा जयघोष करत इथ दर्शन घेतलं. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील लाखो भाविक मागील आठ दिवसांपासून मांढरदेवला आले आहेत. प्रथेप्रमाणे काळुबाई देवीची देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक आणि जिल्हा व सत्र न्याायधीश जी. डी. तडवळकर यांच्या हस्ते महापुजा करण्यात आली.

close