सांगलीत हळदीला आला सोन्याचा भाव

January 20, 2011 1:05 PM0 commentsViews: 11

20 जानेवारी

सांगली ही हळदीची प्रमुख बाजारपेठ. आज हळदीचे जे सौदे निघाले त्याला अक्षरश: सोन्याचा भाव मिळाला. प्रती क्विंटल 16 हजार ते 21 हजार रुपये इतका विक्रमी भाव हळदीला मिळाला. देशभरातून सांगलीत हळद विक्रीसाठी आणली जाते. इथल्या हळदीचे बाजारात साठवणुकीसाठी पेवांची उत्तम व्यवस्था असल्याने आणि पेवातील बँकांकडून तारण कर्ज मिळण्याची सुविधा असल्याने देशभरातील हळद उत्पादक शेतकर्‍यांची सांगलीच्या बाजारपेठेला पहिली पसंती आहे.

कडप्पा, राजापुरी , निजामाबाद अशा हळदीच्या वेगवेगळ्या प्रकारांची विक्री करण्यात येते. आज हळदीच्या सौद्यांचा शुभारंभ करण्यात आला. आज 1300 ते 1400 क्विंटल हळदीची विक्री करण्यात आली. गेल्या वर्षी सुमारे साडे सहा लाख क्विंटल हळदीची विक्री झाली होती. यंदा हे प्रमाण आणखी जास्त वाढणार आहे.असा अंदाज कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे वर्तवण्यात येत आहे.

close