मुंबई शहराच्या नियोजनाबाबत बैठकीला अधिकारी गैरहजर ; बैठक रद्द

January 20, 2011 1:36 PM0 commentsViews: 3

20 जानेवारी

मुंबई शहराच्या नियोजनाबाबत आज मंत्रालयात बोलावलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्यानं आज रद्द करावी लागली. याबाबत मनसेनं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार केली. या समितीची बैठक मुंबई शहराच्या विकास कामाबाबत महत्वाची असते. वर्षातून अशा प्रकारे चार बैठका होत असताना सध्या फक्त एकच बैठक होते. आणि या बैठकीत एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित का राहिला नाही याचा शोध मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी मनसेचे आमदार नितिन सरदेसाई यांनी पत्रात केली. बैठकीला मंत्री, पालकमंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित असताना अधिकार्‍यांमुळे महत्वाची बैठक रद्द करावी लागली ही अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याची टीकाही सरदेसाई यांनी केली.

close