अखेर रामानंद तिवारी निलंबित

January 20, 2011 2:53 PM0 commentsViews: 1

20 जानेवारी

आदर्श घोटाळ्यातल्या सहभागामुळे वादात अडकलेले माहिती आयुक्त रामानंद तिवारी यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई झाली. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी आज संध्याकाळी तिवारी यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला. माहिती अधिकार कायद्याच्या कलम 17-1 नुसार तिवारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यापूर्वी मंगळवारी राज्यपालांनी तिवारींच्या बडतर्फीसाठी आवश्यक असलेली चौकशी करण्याची शिफारस सुप्रीम कोर्टाकडे केली होती. कोर्टाचा चौकशी अहवाल जर का तिवारी यांच्या विरोधात गेला तर राज्यपाल तिवारी यांच्यावर बडतर्फीची कारवाईसुद्धा करू शकतात. आदर्श घोटाळ्यातला एक मोठा मोहरा तिवारी यांच्या रुपानं गळाला. आदर्श घोटाळा होत असतानाच्या संपूर्ण दहा वर्षांच्या काळात तिवारी यांच्याकडेच नगरविकास खात्याची सूत्रं होती. त्यांच्या देखरेखीखालीच आदर्श सोसायटीला विकासाची परवानगी आणि पर्यावरण मंजुरीचं बनावट पत्र जारी झालं. त्यामुळेच त्यांचा हा सहभाग स्पष्ट दिसत होता. म्हणून राज्य सरकारनं राज्यपालांकडे तिवारींना माहिती आयुक्त पदावरून हटवण्याची शिफारस केली होती.

close