आयपीएलच्या धरतीवर औरंगाबादमध्ये ‘एपीएल’ स्पर्धा

January 20, 2011 4:34 PM0 commentsViews: 3

20 जानेवारी

आयपीएलच्या धर्तीवर सुरू केलेल्या एपीएल अर्थात औरंगाबाद प्रिमीयर लिग क्रिकेट स्पर्धेचंं मोठ्या थाटात उदघाटन झालं. औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलावर 28 जानेवारीपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत दहा संघ सहभागी झाले आहेत. गेल्या तीन वर्षात मिळालेला जोरदार प्रतिसाद लक्षात घेऊन यावेळी एपीएल क्रिकेट स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर घेतली जात आहे. रेशम टिपणीस आणि सोनाली कुलकर्णीच्या नृत्यांनी या सोहळ्याच्या उद्घाटनाची रंगत वाढविली. उद्घाटन समारंभाला लोकमत समूहाचे प्रबंध संचालक ऋषी दर्डा, एपीएलचे अध्यक्ष करण दर्डा, स्पर्धेचे प्रायोजक राजूरी स्टीलचे दिनेश राठी, द्वारकाप्रसाद सोनी उपस्थित होते.

close