कॉमनवेल्थ समितीच्या विरोधात विदेशी कंपन्या कोर्टात जाणार

January 20, 2011 5:43 PM0 commentsViews: 5

20 जानेवारी

कॉमनवेल्थ घोटाळ्यात अडकलेले आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि त्यांचे सहकारी आणखी अडचणीत आले आहेत. कॉमनवेल्थमधल्या कामांचे पैसे थकवल्यानं ऑस्ट्रेलियातल्या कंपन्यांनी या सर्वांना कोर्टात खेचण्याची तयारी सुरू केली आहे. आयोजन समितीनं कोट्यवधी रुपये दिले नसल्याचं ऑस्ट्रेलियन कॉमनवेल्थ असोसिएशननं म्हटलं आहे. कॉमनवेल्थचा उद्घाटन आणि समारोप सोहळा, डिझाईन आणि 40 कोटींच्या बलूनसाठी ऑस्ट्रेलियन कंपन्यांनी केलेल्या कामाचे हे पैसे आहेत. Rहे पैसे चुकते करावेत असं पत्र ऑस्ट्रेलियन सरकारनं आयोजन समितीला लिहिलं आहे. परराष्ट्र आणि क्रीडा मंत्रालयाला त्याची एक झेरॉक्सही पाठवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री केव्हिन रुड्ड यांनी याबाबत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. एम कृष्णा यांच्याशी चर्चाही केली. हा मुद्दा क्रीडा मंत्रालयाकडे उपस्थित करण्याचं आश्वासन कृष्णा यांनी रुड्ड यांना दिलं आहे. तर या प्रकरणाचा तपास करून 10 दिवसांच्या आत पैसे चुकते करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिल्याचा दावा क्रीडा राज्यमंत्री अजय माकन यांनी केला आहे.

close