काळ्या पैश्यावरुन ममता बॅनर्जी यांनी चिंता व्यक्त केली

January 20, 2011 5:49 PM0 commentsViews: 2

20 जानेवारी

काळा पैसा ही देशाची लूट आहे असं सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर केंद्र सरकारनं आता या प्रकरणाची दखल घेतली आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काळ्या पैशाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वतःहूनच हा मुद्दा मंत्र्यांसमोर उपस्थित केला. रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. आणि आता कारवाई करण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे. पण स्वीस बँकेतल्या खात्यांच्या तपशील उघड करण्याची सरकारची तयारी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्वीस बँकेत खाती असलेल्या भारतीयांची नावं उघड करा अशी मागणी भाजपनंही केली होती. सरकार त्यावर कोणतीच पावलं उचलत नसल्याचा आरोप ही त्यांनी केला होता. काळ्या पैशाबाबत सरकारचं काय धोरण आहे हे स्पष्ट करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी पत्रकार परिषद घेणार आहेत.

close