आरुषी हत्याप्रकरणी तलवार यांची कोर्टानं याचिका फेटाळली

January 21, 2011 9:49 AM0 commentsViews: 3

21 जानेवारी

आरुषी हत्याप्रकरणी गाझियाबाद कोर्टानंही आरुषीचे वडील राजेश तलवार यांना धक्का दिला. सीबीआयने सादर केलेला क्लोजर रिपोर्ट, केस डायरी आणि इतर माहिती मिळण्यासाठीच्या तलवार यांची याचिका कोर्टानं फेटाळली आहेत. राजेश तलवार हे याप्रकरणातले एक संशयित आरोपी असल्याने त्यांना ही माहिती मिळण्याचे अधिकार नाहीत असं म्हणणं सीबीआयनं मांडलं आहे. केससंदर्भातली सर्व माहिती ही केवळ कोर्टाच्या संदर्भासाठी देण्यात आली होती असंही म्हणणं सीबीआयनं मांडलं आहे. तर सीबीआयनं आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये कोणालाही दोषी ठरवलं नव्हतं त्यामुळे हे रिपोर्ट पहाण्याचा आम्हाला अधिकार आहे अशी तलवार यांची बाजू आहे. कोर्टानं त्यांचा हा दावा फेटाळला.

close