चित्रपट निर्माता नुरानींच्या विरोधात संजय दत्तची धमकी दिल्याची तक्रार

January 21, 2011 9:56 AM0 commentsViews: 2

21 जानेवारीसंजय दत्त यानं चित्रपट निर्माता शकील नुरानी यांच्या विरोधात धमकी दिल्याची तक्रार केली आहे. निर्माता शकील नुरानी यानं आपल्याला गँगस्टर छोटा शकील याच्याकडून धमकी दिल्याचं संजय दत्त यांचं म्हणणं आहे. याबाबत संजय दत्तनं क्राईम ब्रँचचे पोलीस सहआयुक्त हिमांशू रॉय यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन रॉय यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचच्या युनीट 5चे अधिकारी करत आहेत. आज या प्रकरणी शकील नुरानी यांची चौकशी करणार आहेत.

close