लवासाविषयीच्या पर्यावरण मंत्रालयाचा अहवाल अमान्य – अजित गुलाबचंद

January 21, 2011 10:07 AM0 commentsViews: 3

21 जानेवारीलवासा प्रकरणी पर्यावरण मंत्रालयाच्या समितीच्या दोन अहवालाशी आम्ही सहमत नाही असं एचएससीचे चेअरमन अजित गुलाबचंद यांनी म्हटलं आहे. यावर चर्चा करण्यासाठी आम्ही पुन्हा पर्यावरण मंत्रालयाशी संपर्क साधणार आहोत. थोड्याप्रमाणात तिथं नियमांचं उल्लंघन झाल्याचं आम्हाला मान्य आहे. मात्र त्याचा परिणाम फारसा मोठा नाही. हा प्रश्न राज्य सरकार आणि पर्यावरण मंत्रालयाच्या अखत्यारीमधला आहे. आमचा त्याच्याशी थेट संबंध येत नाही. मात्र अंतिम निर्णयावर पोहोचण्यासाठी पर्यावरण खात्याला सहकार्य करायला आम्हाला आवडेल असंही त्यांनी म्हटलं.

close