उरणजवळ तेलगळती

January 21, 2011 10:21 AM0 commentsViews: 5

21 जानेवारीबॉम्बे हायपासून उरण पर्यंत तेल वाहून नेणार्‍या पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे समुद्रात तेलगळती झाली. समुद्रकिनार्‍यावर तेलाचे तवंग दिसून आले आहेत. पाईपलाईन लिक झाल्यामुळे सकाळी ओएनजीसीनं तेल उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला. सकाळी साडेनऊपासून बॉम्बे हाय आणि बेसीन ऑईल फिल्डपासून 2 किलोमीटर अंतरावर ही तेल गळती झाली. मुंबई बंदरापासून 80 किलोमीटर अंतरावर गळती झाली. रोज 2 लाख 47 हजार बॅरेल तेलाचं उत्पादन करण्यात येतं. या तेलगळतीमुळे आज 25 हजार बॅरल तेलाचं कमी उत्पादन झालं आहे. पाईपलाईन दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. सध्या उत्पादित होणारं तेल दुसर्‍या पाईपलाईनमधून पाठवण्यात येतं आहे. बॉम्बेहायपासून आणि बेसीन ऑईल फिल्डपासून तेलाचा तंवग दोन किलोमीटरर्यंत पोहोचला आहे. तो किनार्‍यावर पोहोचणार नाही. गळती नियंत्रणात असल्याचा कोस्ट गार्डचा दावा आहे.

close