राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पतंगरावांनी सरकारला लक्ष्य केलं.

November 3, 2008 1:09 PM0 commentsViews: 2

3 नोव्हेंबर , औरंगाबादऔरंगाबादमध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यक्रमात सहकारमंत्री पतंगराव कदम यांनी शिक्षणपद्धतीवरून आपल्याच सरकारला लक्ष्य केलं. राज्याचंअनुदान धोरण, परिवर्तनाची भाषा आणि केंद्राची भूमिका अशा वेगवेगळ्या विषयांवर पतंगरावांनी टीका करून स्वकियांनाच घरचा आहेर दिलाय. विशेष म्हणजे राष्ट्रपतींच्या उपस्थितीतच सहकारमंत्र्यांनी केंद्र सरकारवरही तक्रारवजा टीका केली आहे. या कार्यक्रमात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते. तसंच सहकारमंत्र्यांनी शेतक-यांच्या आत्महत्येसंदर्भात सरकारनं नेमलेल्या जाधव कमिटीवरच हल्ला चढवला. जाधव यांनी दिलेले आकडे खोटे असं पी. साईनाथ सांगतात. त्यामुळे खरा आकडा कुणालाच माहित नाही, अशी मिश्किल टिप्पणीही पतंगराव कदम यांनी केली.

close