टू जी स्पेक्ट्रम प्रकरणी सुप्रीम कोर्टानं सिब्बल यांना फटकारलं

January 21, 2011 10:42 AM0 commentsViews: 2

21 जानेवारी

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं 11 टेलिकॉम कंपन्यांना आणि ट्रायलाही नोटीस बजावली आहे. कोर्टानं दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांना जोरदार फटकार लगावली. सिब्बल यांनी प्रसार माध्यमातून 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावरील कॅग रिपोर्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हे अंत्यत दुर्देवी आहे मंत्र्यानी जबाबदारीन वागायला हवं या शब्दात कोर्टानं सिब्बल यांच्यावर ताशेरे ओढले. सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी करतांना सुप्रीम कोर्टानं ही नोटीस बजावली. स्वामी यांनी या कंपन्यांचे लायसन्स रद्द करावे या मागणीसाठी याचिका दाखल केली. सीबीआयने मंत्र्यांच्या या टीकेकडे लक्ष न देता निप:क्षपातीपणे चौकशी करावी अशा कडक सूचनाही कोर्टाने दिल्या आहेत. ए राजा दूरसंचार मंत्री असताना 1.67 लाख कोटींचा हा टू जी घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

close