जैतापूर प्रकल्प विरोधकांना राणेंचा सज्जड दम !

January 21, 2011 10:56 AM0 commentsViews: 1

21 जानेवारी

जैतापूर अणू उर्जा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी स्वीकारली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्याबाबतच्या सर्व मागण्या आपण मान्य करु मात्र या प्रकल्पाला आता यापुढे विरोध झाला तर विरोध करायला येणार्‍यांना परत जाऊ दिलं जाणार नाही असा सज्जड दम राणेंनी यांनी भरला.आज रत्नागिरीत काँग्रेस कार्यकर्त्याांच्या मेळाव्यात बोलताना राणेंनी विरोधकांचा या प्रकल्पाला होणारा विरोध मोडून काढण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर का उतरले नाहीत असा सवालही उपस्थित केला. त्यामुळे जैतापूर प्रकल्पावरुन आता नारायण राणे आणि प्रकल्प विरोधक असा नवा संघर्ष सुरु होण्याची शक्यता आहे.

close