ग्रॅहम स्टेन्स हत्येप्रकरणी दारासिंगची जन्मठेपेची शिक्षा कायम

January 21, 2011 11:23 AM0 commentsViews: 2

21 जानेवारीग्रॅहम स्टेन प्रकरणात आरोपी दारासिंग आणि महेंद्र हेमब्रम यांची जन्मठेपेची शिक्षा सुप्रीम कोर्टानं कायम ठेवली. यामुळे सीबीआयला मोठा धक्का बसला आहे. तर 11 इतर जणांना निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णयही सुप्रीम कोर्टानं कायम ठेवला आहे. ओरिसातील केहंजर जिल्ह्यात 1999 मध्ये ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्रॅहम स्टेन आणि त्यांच्या दोन मुलांची हत्या करण्यात आली होती. 2003 मध्ये ओरिसातल्या सत्र न्यायालयानं दारासिंगला फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र ओरिसा उच्च न्यायालयानं या शिक्षेचं रूपांतर 2005 मध्ये जन्मठेपेत करण्यात आलं.

close