दिलीप प्रभावळकर आणि रानडे यांना संगीत नाटय पुरस्कार

January 21, 2011 12:28 PM0 commentsViews: 5

21 जानेवारी

सांस्कृतिक क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणार्‍या संगीत नाटक अकादमीच्या अकादमी पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर, संगीततज्ज्ञ डॉ. अशोक रानडे यांच्यासोबतच पंढरपूर इथल्या पहिला महिला भारूड कलावंत चंदाबाई तिवाडी यांना यावर्षीच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. तर बनारस घराण्याच्या प्रख्यात ठुमरी गायिका गिरीजादेवी आणि आंध्रनाट्यम ही नृत्यशैली पुनरूज्जीवीत करणारे नटराज रामकृष्ण या दोघांना अकादमीरत्न या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. नवी दिल्लीत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. एकूण 38 जणांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. अकादमी पुरस्कार एक लाख रूपये आणि ताम्रपत्र तर अकादमीरत्न पुरस्कार तीन लाख रूपये आणि ताम्रपत्र अशा स्वरूपाचा आहे.

close