पुण्यात आरटीआय कार्यकर्त्यांवर हल्ला

January 21, 2011 12:39 PM0 commentsViews: 5

21 जानेवारी

सरकारी गायरान जमिनीवर बेकायदेशीर वीट कारखाना उभारणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा माहितीच्या अधिकाराचा वापर करुन पर्दाफाश केल्यानं आरटीआय कार्यकर्ते सुधीर काळे यांचे भाऊ बाळू काळे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्यात त्यांच्या डोक्याला हाताला जबर मार बसला. मोटार सायकलवरुन जात असताना भर रस्त्यात अडवून त्यांना मारहाण करण्यात आली. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील निमोने-पिंपळवाडी इथं हा प्रकार घडला.मात्र आठ दिवस उलटून गेले तरीही या हल्ल्यातले हल्लेखोर मोकाटच आहेत. यामध्ये कोणालाही अजून अटक करण्यात आली नाही.

close