अमरावतीत विद्यार्थ्यांनी भरवलं शेतीविषयक प्रदर्शन

January 21, 2011 12:55 PM0 commentsViews: 26

21 जानेवारी

टेक फेस्ट हे नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरतात. अमरावतीत राष्ट्रीय तंत्रज्ञान प्रदर्शन भरलेलं आहे. पी आर पोटे इंजिनीयरींग कॉलेजमध्ये प्रदर्शन सुरु आहे. या संपुर्ण प्रदर्शनात शेतकर्‍यांना केंद्रीत करुन अनेक उपकरण मांडण्यात आली. ऍग्रो रोबोट, सोलार ट्रक, पिक कापण्याचं यंत्र, सोलार एनर्जीवर चालणारी अनेक उपकरणं, हाय स्पीडकंट्रोलर अशा गोष्टी केवळ शेतकर्‍यांचीच नव्हेत तर सर्वसामान्यांचंही लक्ष वेधून घेत आहेत.आध्र प्रदेश, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा सह इतर राज्यातल्या इंजिनिअरिंगच्या विविध शाखेच्या विद्यार्थ्यांनी 100 पेक्षा जास्त प्रोजेक्ट सादर केले. या प्रदर्शनाला अमरावतीकरांकडून मोठा प्रतिसाद मिळतो.

close