दादा खेळणार कोचीकडून ?

January 21, 2011 12:59 PM0 commentsViews: 2

21 जानेवारी

आयपीएलच्या चौथ्या हंगामासाठी नुकत्याच झालेल्या लिलावात भारताची माजी कॅप्टन सौरव गांगुलीवर एकाही टीमनं बोली लावली नव्हती. पण आता गांगुली पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळताना आपल्याला दिसण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोची टीम गांगुलीबरोबर करार करण्यास उत्सुक आहे. आणि संदर्भात त्यांनी आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलकडे मान्यता मागितली असून त्यांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. आता आयपीएलमधल्या इतर फ्रँन्चाईजीनी यावर होकार दर्शवला पाहिजे. आयपीएलच्या गेल्या हंगामात गांगुली कोलकाता नाईट रायडर्सतर्फे खेळला होता.

close