स्वाभिमान संघटना टार्गेट का ? – नितेश राणे

January 21, 2011 1:33 PM0 commentsViews: 36

21 जानेवारी

स्वाभिमान संघटना काँग्रेसच्या अजिबात विरोधात नाही. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये आमची मदत चालते मग राजकीयदृष्ट्या आम्हाला का टार्गेट केलं जातं असा सवाल स्वाभिमानचे अध्यक्ष नितेश राणे यांनी केला. दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात माणिकराव ठाकरे आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव यांनी काँग्रेसमध्ये असणार्‍यांनी इतर संघटना वाढवू नयेत असं म्हटलं होतं. हा टोला स्वाभिमानलाच होता. त्याला उत्तर देताना नितेश राणे यांनी अशी टीका केली.

close