हंगल यांना बच्चन परिवाराकडून वैद्यकीय मदत

January 21, 2011 2:02 PM0 commentsViews: 7

21 जानेवारी

ज्येष्ठ अभिनेते ए.के हंगल यांच्या मदतीसाठी आता बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन पुढे सरसावला आहे. ज्येष्ठ अभिनेते ए.के हंगल हे सध्या खूपच हलाखीच्या परिस्थित आहेत. मीडियामधून ए.के .हंगल यांच्या परिस्थितीविषयीच्या बातम्या ऐकल्यावर बिग बी आणि त्यांची पत्नी अभिनेत्री जया बच्चन यांनी ए.के हंगल यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च करण्याचा निर्णय बच्चन दाम्पत्याने घेतला. जया बच्चन यांनी एका पत्रकाद्वारे ही घोषणा केली. अमिताभ आणि जया बच्चन यांनी ए .के हंगल यांच्यासोबत शोले सिनेमात एकत्र काम केलं आहे. बच्चन कुटुंबियांना ए.के हंगल यांच्याविषयी नितांत आदर आहे. हंगल यांना लागेल ती मदत करण्याचा निर्धार बिग बी आणि जया बच्चन यांनी व्यक्त केला.

close