भूमीपुजनासाठी आबा आणि भुजबळ आले बैलगाडीतून !

January 21, 2011 5:00 PM0 commentsViews: 4

21 जानेवारी

मंत्री म्हटलं की लाल दिव्याची गाडी आलीच पण हेच मंत्री जर बैलगाडीतून आले तर आश्चर्य वाटलं ना हो पण हे खरं आहे, राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज चक्क बैलगाडीतून फेरफटका मारला. सांगली जवळच्या इनामधामनी गावात नुतन ग्रामपंचायत आणि नविन बसस्थानकाच्या भूमीपुजन करण्यासाठी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि छगन भुजबळ आज सांगलीमध्ये आले होते. महर्षी वाल्मिकी कोळीसमाज यांच्याकडून या दोन्ही नेत्यांचं बैलगाडीमध्ये बसवून स्वागत करण्यात आलं. यावेळी दोन्ही नेत्यांनी बैलगाडीमध्ये बसण्याचा आनंद लुटला.

close