राजच्या आंदोलनाचा मार्ग आवडला नाही – अण्णा हजारे

November 3, 2008 2:48 PM0 commentsViews: 55

3 नोव्हेंबर, अहमदनगर रेल्वेची परीक्षा देण्यासाठी मुंबईत आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करण्यापासून ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी हिंसाचार उसळला होता. परप्रांतियांविरोधातील आंदोलनावर मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. याबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे म्हणाले, राजच्या काही गोष्टी मला आवडतात. पण जाळपोळ, तोडफोड हे मला आवडत नाही. यात राजकारणाचा वास येतो. हे सर्व सत्तेसाठी चाललंय, असं मला वाटतंय. राज्यातील तरुणांना नोकर्‍या देणं, ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. नोकर्‍या मिळत नसतील, ते राज्यकर्त्यांना अपमानकारक वाटलं पाहिजे. पोट भरण्यासाठी तरुणांना इतर राज्यात का जावं लागतं, हे तिथल्या राजकारण्यांनीही पाहिलं पाहिजे ', असं अण्णा हजारे यांनी आयबीएन-लोकमतशी बोलताना सांगितलं.

close