जैतापूर प्रकल्पग्रस्तांना NPCIL देणार एकरी 10 लाख – नारायण राणे

January 22, 2011 3:32 PM0 commentsViews: 5

22 जानेवारी, मुंबई

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांना एकरी 10 लाख रुपये देण्याची तयारी न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशननं दाखवल्याची माहिती उद्योगमंत्री नारायण राणेंनी दिली आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी केलेल्या मागण्या NPCIL नं मान्य केल्यात. आता सरकारच्या प्रस्तावाची प्रतिक्षा आहे, असं राणे यांनी सांगितलं. जैतापूर प्रकल्प हा कोकणाच्या तसंच राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचा असल्याचं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलंय. जैतापूरला जाऊन प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन त्यांची समजूत घालू असंही राणे म्हणाले.

close