येडियुरप्पा आज राष्ट्रपतींची भेट घेणार

January 24, 2011 7:52 AM0 commentsViews: 1

24 जानेवारी

कर्नाटकात राज्यपाल आणि मुख्यमंत्री येडियुरप्पांमध्ये सुरू असलेला वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. राज्यपाल हंसराज भारव्दाज यांना परत बोलावण्यात यावं या मागणीचा भाजपनं पुनरूच्चार केला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी येडियुरप्पा सध्या दिल्लीत आहेत. आज सोमवारी ते भाजप खासदारांसोबत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट घेऊन राज्यपालांविरूध्द तक्रार करणार आहेत. राज्यपाल हंसराज भारद्वाज आणि मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यातला संघर्ष तीव्र झाला. काही झालं तरी आपण राजीनामा देणार नाही असं येडियुरप्पा यांनी स्पष्ट केलं. राज्यपाल हे काँग्रेसचे राजकीय दलाल आहेत असा आरोप ही त्यांनी केला. भूखंड घोटाळ्याप्रकरणी येडियुरप्पा आणि गृहमंत्री के अशोक यांच्याविरोधात खटला चालवायला भारद्वाज यांनी मंजुरी दिली. राज्यपालांच्या या निर्णयावर भाजपनं कडाडून हल्ला केला. तर केंद्र सरकारनं राज्यपालांना परत बोलवावं ही मागणी करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय नेते राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेणार आहेत.

close