युसूफची एकाकी झुंज अपयशी ; भारताने मालिका गमावली

January 24, 2011 8:20 AM0 commentsViews: 4

24 जानेवारी

सेंच्युरियन वन डेत दक्षिण आफ्रिकेनं भारतीय टीमचा 33 रन्सनी पराभव केला. आणि या पराभवाबरोबरच एकदिवसीय मालिका भारतानं 3-2 अशी गमावली. भारतासमोर जिंकण्यासाठी 268 रन्सचं लक्ष्य होतं. पण 234 रन्समध्येच भारतीय टीम ऑल आऊट झाली. या मॅचचा खरा हिरो ठरला तो युसुफ पठाण. भारताची टॉप ऑर्डर काल झटपट कोसळली रोहित शर्मा, विराट कोहली, एम. एस. धोणी, पार्थिव पटेल, युवराज सिंग तसेच सुरेश रैना हे टॉप बॅट्समन अवघ्या 74 रन्समध्येच पॅव्हेलियनमध्ये परतले. पण त्यानंतर युसुफ पठाणने धडाकेबाज खेळी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं. द. आफ्रिकेच्या बॅट्समनना पठाणी हिसका दाखवत त्याने भारताला विजयाच्या आशा मिळवून दिल्या. फक्त 70 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 8 फोर ठोकत त्याने 105 रन्सची शानदार खेळी केली. पण अखेर मॉर्केलने त्याला आऊट करत आफ्रिकेच्या विजयाच्या वाटेतला अडसर दुर केला.

त्याआधी पहिली बॅटींग करताना आफ्रिकन टीमने 46 ओव्हर्समध्ये नऊ गडी गमावत 250 रन्स केले. पण दक्षिण आफ्रिकेच्या इनिंगमध्ये आलेल्या पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय टीमसाठी सुधारित लक्ष्य ठेवण्यात आलं. हाशिम आमलाची नॉटआऊट सेंच्युरी हे इनिंगचं वैशिष्ट्य ठरलं. त्याशिवाय मॉर्नी वॅन विकने 56 रन केले. मिडल ऑर्डर मात्र झटपट आऊट झाली. पण आमलाने 116 रन करत टीमला अडीचशे रन्सचा टप्पा गाठून दिला. हाशिम आमला मॅन ऑफ द मॅच ठरला.

close