उस्मानाबादमध्ये 4 मुलींवर बलात्कार करणार्‍या तिघांना अटक

January 24, 2011 4:54 PM0 commentsViews: 2

24 जानेवारी

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा येथे आठवडी बाजाराहून घरी जात असताना चार तरूणींना अडवून त्याच्यावर पाशवी बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांत 4 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. उस्मानबाद येथील तेरखेडा येथे पारधी समाजाचा 4 मुलींवर जंगलात नेऊन बलात्कार केला. यामध्ये पोलिसांनी जमीर दारूवाले, अय्युब पठाण, धनंजय उकरंडे व राजू पठाण या चौथ्या तरूणांवर येरमाळा पोलिसात गुन्हा नोंद केला. यातील दारूवाले हा आरोपी अद्याप फरार आहे. जमीर दारूवाला हा गेल्या 15 दिवसांपासून पुणे येथे असल्याचा प्राथमिक तपासात उघड झालं. पोलिस या प्रकरणात डिएनए चाचणी करणार असल्यामुळे त्याच्या अहवालानंतर याप्रकरणाचं सत्य बाहेर येणार आहेत.

close