हिंसक आंदोलनाच्या बाजूने राज्यात कोणीही नाही – ना.धो.महानोर

November 3, 2008 3:11 PM0 commentsViews: 71

3 नोव्हेंबर,जळगावपरप्रांतीयाच्या मुद्यावरुन मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभरात गोंधळ घातला. याबाबत बोलताना प्रसिद्ध कवी ना.धो.महानोर यांनी राज ठाकरे यांच्या आंदोलनाचा मार्ग चुकीचा असल्याचं सांगितलं. ' हिंसक आंदोलनाच्या बाजूने महाराष्ट्रातील कुठलाही समाज नाही. राज ठाकरेंना हा मुद्दा ठोस मांडायचा असल्यास, चांगल्या लोकांना बरोबर घ्यावं. मग दिल्लीपर्यंत हा मुद्दा न्यावा ', असं महानोर म्हणाले.

close