कांदयाचे दर कोसळल्यानं शेतकर्‍यांचं रास्ता रोको आंदोलन

January 24, 2011 4:57 PM0 commentsViews: 2

24 जानेवारी

नाशिकच्या घाऊक बाजारात कांद्याचे भाव कोसळले आहेत. बाजार सुरू होताच सतराशे रुपये क्विंटल म्हणजे 13 रुपये किलो एवढे भाव पडला. त्यामुळे शेतकर्‍यांनी संतापले आहेत. लासलगाव, मनमाड, चांदवड, पिंपळगाव बसवंत या सर्व बाजारसमित्यांमध्ये कांद्याची मोठी आवक झाली आहे. गेल्या महिन्यात भाव वाढले तेव्हा केंद्र सरकारनं लादलेली निर्यातबंदी 15 जानेवारीनंतरही कायम आहे. ती त्वरित मागे घ्यावी अशी मागणी पुढे येत आहेत. मनमाडमध्ये संतप्त शेतकर्‍यांनी रास्तारोको केला.

close