अजित पवार भीमसेन जोशींच्या अंत्यसंस्काराला अनुपस्थित

January 24, 2011 4:59 PM0 commentsViews: 3

24 जानेवारी

पंडित भीमसेन जोशी यांच्या अंत्यसंस्काराला पुण्याचे पालकमंत्री अजित पवार मात्र उपस्थित नव्हते. पंडित भीमसेन जोशींना पुण्यात अखेरचा निरोप दिला जात असताना अजित पवार मात्र स्वतःच्या सत्कार संमारंभात मग्न होते. पालकमंत्री या नात्यानं अजित पवार आज पुण्यात असणं गरजेचं होतं. पण सध्या ते कोल्हापुरात एका कार्यक्रमात आहेत. तिथूनच त्यांनी पंडित भीमसेन जोशी यांना श्रद्धांजली वाहिली. तर पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी हेसुद्धा पंडितजींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले नाहीत.

close