भाजपचा नेत्यांना जम्मूत रोखले

January 24, 2011 5:10 PM0 commentsViews: 2

24 जानेवारी

श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावण्याच्या मुद्द्यावरून आज दिवसभर जोरदार नाट्य घडलं. लाल चौकात 26 जानेवारीच्या दिवशी राष्ट्रध्वज फडकावण्याचा निश्चय भाजपनं केला. तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती असल्यामुळे जम्मू-काश्मीर सरकारनं याला विरोध केला. तिरंगा फडकवण्याच्या तयारीसाठी गेलेल्या सुषमा स्वराज, अरूण जेटली आणि अनंत कुमार या भाजपच्या नेत्यांना जम्मू एअरपोर्टवर थांबवण्यात आलं. तिरंग्याला विरोध करणारं हे सरकार आम्हाला आणीबाणीची आठवण करून देतं अशी जळजळीत प्रतिक्रिया भाजपनं दिली.

close