महापालिकेच्या सुरक्षारक्षकांचा संप मागे

January 24, 2011 5:20 PM0 commentsViews: 1

24 जानेवारी

मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षारक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी पुकारलेला संप आता मागे घेतला आहे. हे सर्व कामगार उद्या मंगळवारपासून कामावर रूजू होणार आहे. कंत्राटी कामगारांना विरोध करण्यासाठी त्यांनी हा विरोध केला होता. पण प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं आहे. या सुरक्षारक्षकांनी केलेल्या मागण्यांबाबत विचार करण्याचे प्रशासनाने आश्वासन दिलं. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा रक्षकांनी आपला संप मागे घेतला आहेत.

close