अरुणाची अवस्था तपासा सुप्रीम कोर्टाचे आदेश

January 24, 2011 5:28 PM0 commentsViews: 76

24 जानेवारी

गेल्या 38 वर्षांपासून कोमात असणार्‍या अरुणा शानबाग या नर्सची शारीरिक आणि मानसिक अवस्था कशी आहे याची पाहणी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. डॉक्टरांच्या तीन सदस्यांच्या समितीला हे आदेश देण्यात आलेत. अरुणा यांना इच्छामरणाची परवानगी द्यावी या मागणीसाठी अरुणा यांच्या वतीनं त्यांच्या वकील पिंकी विरानी यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला नोटीशी बजावल्या आहेत. आणि कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला जीवन संपवण्याची परवानगी देता येत नसल्याचं स्पष्ट केलं. 59 वर्षांच्या अरुणा गेल्या 38 वर्षांपासून मुंबईतल्या केईम हॉस्पिटलमध्ये कोमात आहेत. 1973 मध्ये हॉस्पिटलमधला वॉर्डबॉय सोहनलाल वाल्मिकी यानं त्यांच्यावर बलात्कार केला होता. आणि त्यानंतर त्यांना साखळदंडानं आवळलं होतं. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा बंद होऊन अरुणा कोमात गेल्या.

close