सचिनला भारतरत्न देण्यात यावा महाराष्ट्र सरकारची शिफारस

January 24, 2011 5:30 PM0 commentsViews: 5

24 जानेवारी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात यावा अशी शिफारस महाराष्ट्र सरकारनं केली. क्रिकेटमध्ये बॅटिंगचे जवळपास सर्व रेकॉर्ड सचिनच्या नावावर जमा आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये सेंच्युरीची हाफसेंच्युरी 14 हजाराहून अधिक रन्स सचिनच्या नावावर जमा आहेत. याशिवाय ग्वाल्हेर वन डेत सचिननं 200 रन्सची अजरामर खेळी केली होती. वन डेमध्ये अशी कामगिरी करणारा तो क्रिकेट जगतातील एकमेव खेळाडू आहे. क्रिकेट खेळणार्‍या प्रत्येक देशाविरुध्द त्यानं सेंच्युरी ठोकली. त्याच्या या कामगिरीमुळे भारताची जगभरात एक वेगळी ओळख तयार झाली. भारतरत्न पुरस्कारासाठी सचिनचं नाव आघाडीवर आहे.

close