मॉस्कोमध्ये बॉम्बस्फोट 31 जणांचा मृत्यू

January 24, 2011 5:35 PM0 commentsViews: 1

24 जानेवारी

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये काही वेळापूर्वीच एक मोठ्या बाँबस्फोटात 31 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. तर 130 लोक जखमी झालेत. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. मॉस्को शहरातल्या दोमोदेदोवो विमानतळावर झालेला हा स्फोट आत्मघातकी पथकाने केला असल्याची शक्यता आहे. स्फोट झाल्यानंतर शहरातल्या मेट्रो स्थानिकांची कसून तपासणी केली जात आहेत. यात चेचेन अतिरेक्यांचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

close