आरुषीचे वडील तलवार यांच्यावर कोर्टाच्या आवारातच हल्ला

January 25, 2011 9:12 AM0 commentsViews: 4

blank_page25 जानेवारी

आरूषी हत्याकांडात प्रकरणाला आणखी एक नाट्यमय वळण लागलं. आरूषीचे वडील आणि या प्रकरणातील मुख्य संशयित डॉ.राजेश तलवार यांच्यावर सकाळी 11 वाजता गाझीयाबाज कोर्टाबाहेर हल्ला करण्यात आला. उत्तम शर्मा या वाराणसीमधल्या 29 वर्षाच्या तरूणानं एका धारदार चॉपरनं तलवार यांच्या चेहर्‍यावर हल्ला केला. उत्तम शर्माचा या केसशी संबंधित नसून त्याने यापूर्वीसुद्धा असा हल्ला केला होता. फेब्रुवारी 2010 मध्ये रुचिका गेहरोत्राचा विनयभंग करणार्‍या एसपीएस राठोडवर पंचकुला कोर्टाबाहेर त्यानं असाच हल्ला केला होता. उत्तम मनोरूग्ण असल्याचा दावा त्याचे घरचे करत असले तरी पोलिसांनी मात्र त्याची मानसिक स्थिती ठीक असल्याचं म्हटलं आहे. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. डॉ. तलवार यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

close