जळगावातल्या ठेवीदारांनी काढला सहकार आयुक्तालयावर मुकमोर्चा

November 3, 2008 3:22 PM0 commentsViews: 5

03 नोव्हेंबर जळगाव,जळगाव जिल्ह्यातील 13 पतसंस्थांमधील ठेवी अडचणीत आल्यानं ठेवीदारांनी सहकार आयुक्तालयावर मूकमोर्चा काढला. आत्तापर्यंत जिल्हास्तरावर उपोषण, आंदोलन करूनही कोणताही तोडगा निघाला नाही त्यामुळेच हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला आयुक्तालयाच्या बाहेरच अडविण्यात आलं. त्यानंतर पाच जणांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलविण्यात आलं. उपायुक्तांनी चर्चेचं गु-हाळ चालवून मोर्चेक-यांना फक्त तोंडी आश्वासन दिल्यामुळे मोर्चेकरी संतापले. जिल्हास्तरावरील सहकार खात्यातील अधिकारी आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी करत नसल्याचा आरोप मोर्चेक-यांनी केला आहे.

close