रामदास आठवलेंनी घेतली शिवसेनाप्रमुखांची भेट

January 25, 2011 9:17 AM0 commentsViews: 3

25 जानेवारी

शिवशक्ती- भिमशक्तीनं एकत्र यायला हवं अस बाळासाहेब ठाकरेंनी आपणाला सांगीतल्याचं रामदास आठवले यांनी म्हंटलं आहे. आठवले यांनी आज मातोश्रीवर बाळासाहेबांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली. निवडक कार्यकर्त्यांसह आठवले साडेबारा वाजता मातोश्रीत पोहोचले होतेे. मुंबई महानगरपालिक ा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नव्या राजकीय समिकरणांसंदर्भात ही भेट असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आठवले गेल्याचं आरपीआयच्या सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान रामदास आठवले त्यांच्या राजकीय जीवनात पहिल्यांदाच मातोश्रीवर गेले.

close