भारतरत्नसाठी पंतप्रधान कार्यालयानं सचिनचं नाव सुचवलं

January 25, 2011 9:32 AM0 commentsViews: 2

25 जानेवारी

पंतप्रधान कार्यालयानं ही भारतरत्न पुरस्कारासाठी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावाची शिफारस केली आहे. मात्र या संदर्भात अजून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. सर्वोच्च पुरस्कार मिळवण्यात केवळ सचिनच्या वयाची अडचण येवू शकते अशी माहितीही सुत्रांनी दिली. सचिनला दोन वर्षापूर्वी पद्म विभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं अशावेळी भारत रत्न देण हे घाईचं ठरेल असा युक्तीवाद सचिनला विरोध करणार्‍याचा आहे. काल सोमवारी महाराष्ट्र सरकारने ही सचिनला भारतरत्न देण्यात यावा अशी शिफारस केली होती.

close