भारतरत्न पुरस्कार हा भारतीयाचं स्वप्न असतं – सचिन तेंडुलकर

January 25, 2011 12:53 PM0 commentsViews: 3

25 जानेवारी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकर यांच्या निवडक कविता आता सीडी रुपात येणार आहे. आणि या सीडीची अधिकृत घोषणा आज केली ती खुद्ध मास्टरब्लास्टरने. मुंबईत एका कार्यक्रमात सचिन आणि त्याचा मोठा भाऊ नितिन तेंडुलकर उपस्थित होते. सत्यकथा या मासिकात नियमितपणे प्रसिद्ध झालेल्या तेंडुलकरांच्या कविता लोकप्रिय होत्या. त्यातल्याच नऊ कविता भाव मुके नावाच्या या सीडीत असतील. येत्या 29 तारखेला ही सीडी प्रकाशित होईल. या सीडीची कल्पना क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांची असून अशोक पत्की यांनी संगीत दिलं. सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, हरिहरन, शंकर महादेवन या गायकांनी या कवितांना स्वरसाज दिला. सचिनचा मोठा भाऊ नितीन तेंडुलकर यांच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशनही यावेळी होणार आहे. या कार्यक्रमात पत्रकारांच्या प्रश्नांनाही सचिनने मोकळेपणे उत्तरं दिली. भारतरत्न पुरस्कार हे प्रत्येक भारतीयाचं स्वप्न असतं असंही सचिन यावेळी म्हणाला. दरम्यान भारतरत्न पुरस्काराची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. भारतरत्न पुरस्कारासाठी सचिनचं नाव आघाडीवर आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात यावा अशी शिफारस महाराष्ट्र सरकारनं केंद्रा सरकराकडे केली.

close