हरसिद्धी सोसायटीत शासकीय अधिकार्‍यांचे फ्लॅट्स असण्याची शक्यता

January 25, 2011 4:14 PM0 commentsViews: 2

25 जानेवारी

वरळीत समुद्र किनारी असलेल्या हरसिद्धी सहकारी गृहनिर्माण संस्था विरोधात नेव्हीनं दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. या आधीच्या सुनावणीत हायकोर्टानं सोसायटीला सदस्यांची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोसायटीच्या वकिलांनी ही यादी सादर केली. या यादीत अनेक बडे आयपीएस अधिकारी तसेच आयएएस अधिकार्‍यांचे फ्लॅट असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. याच इमारतीत वाय.पी.सिंग यांचाही फ्लँट आहे. सोसायटीने सादर केलेल्या यादीत योगेश सिंग या नावाचा सदस्य आहे. या इमारतीला बांधकाम करु नये असा आदेश सुरुवातीलाच एसआरएनं दिला होता. त्यानंतरही सोळा मजली इमारत बेकायदेशीरपणे उभारण्यात आली. मुख्य म्हणजे या इमारतीला नेव्हीकडून परवानगी घेण्यात आलेली नाही. यामुळेच नेव्हीने ही याचिका हायकोर्टात दाखल केली आहे.

close