आरबीआयनं बँकांसाठीचे व्याजदर वाढवले

January 25, 2011 1:47 PM0 commentsViews: 1

25 जानेवारी

आरबीआयनं आपला क्रेडीट पॉलिसीचा आढावा जाहीर केला. महागाई आटोक्यात आणण्याची पावलं आरबीआयनं उचली आहे. आरबीआय ज्या दरानं इतर बँकांना कर्ज देते त्याचा व्याज दर आणि ज्या दराने पैसे परत घेते या दोन्ही व्याज दर पाव टक्क्यानं वाढ करण्यात आली. याचाच अर्थ बँकांना आरबीआयकडून होणार कर्ज पुरवठा महाग होणार असल्यानं त्याचा परिणाम थेट ग्राहकांसाठीच्या कर्जावर होण्याची शक्यता आहे. आजच्या पॉलिसीमध्ये आरबीआयनं आणखी एक महत्त्वाची सुचना बँकांना केली आहे. ज्या बँकांनी आपल्याकडच्या ठेवींच्या तुलनेत जास्त कर्ज दिलेली आहेत. त्या बँकांनी कर्जांची संख्या कमी करावी अशा सुचना आरबीआयनं केली. सोबतच महागाईसाठीचं उदिष्टसाडे पाच टक्क्यांवरुन वाढवून आरबीआयनं 7 टक्क्यांवर नेलेलं आहे.

close