बॉम्ब डिफ्युज करणारा दक्ष रोबो

November 3, 2008 5:27 PM0 commentsViews: 3

3 नोव्हेंबर, पुणे पुण्यातील रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हल्पमेंट एस्टॅब्लिशमेंट इंजिनिअर्स यांनी ' दक्ष ' रोबो विकसित केला आहे. या रोबोचा उपयोग स्फोटकं निष्क्रीय करण्यासाठी होणार आहे. लवकरच वेगवेगळ्या संवेदनशील ठिकाणी दक्ष या रोबोचा वापर करण्यात येणार आहे. हा रोबो पायर्‍याही चढू शकतो. त्यामुळे वरच्या मजल्यावरची स्फोटकंही निष्क्रीय करणं शक्य होणार आहे.याबाबत आधिक माहिती डीआरडीओचे जाँइन्ट डायरेक्टर अलोक मुखर्जी यांनी दिली. ' एखादी बेवारस बॅग मिळाल्यास तिला हात लावू नका.अशावेळी दक्ष रोबो त्या बॅगेची तपासणी करेल. रोबोच्या साहाय्यानं ती बॅग दुसरीकडे नेता येते. बॅगेचा एक्स-रे करुन बॉम्ब असल्यास तो डिफ्युजही करता येईल ', असं मुखर्जी यांनी सांगितलं.

close