ए.आर.रेहमानला पुन्हा एकदा ऑस्करसाठी नामांकन

January 25, 2011 3:35 PM0 commentsViews: 2

25 जानेवारी

83 व्या ऑस्कर पुरस्काराच्या नामांकनाची घोषणा आज लॉस एंजलिसला झाली. ए.आर.रेहमानला संगीतासाठी नामांकन मिळालं आहे. एकूण 10 सिनेमांना नामांकन मिळाली. ए. आर. रेहमानला 127 अवर्स सिनेमातल्या 'इफ आय राइज' या गाण्यासाठी नामांकन मिळालं. डॅनी बोएल यांनी दिग्दर्शन केलेला 127 अवर्ससाठी हे नामांकन झालं. दोन वर्षांपूर्वी डॅनी बोएलच्याच स्लमडॉग मिलेनियर सिनेमासाठी ए. आर. रेहमाननं ऑस्कर ऍवॉर्डवर आपली मोहोर उमटवली होती. आताही 127 अवर्स सिनेमातून इतिहासाची पुनरावृत्ती होईल अशी रेहमानच्या चाहत्यांना आशा आहे.

close